असर प्रथमच्या अहवालानुसार देशात महाराष्ट्र पुढे

: देशात शिक्षणाविषयी वेगवेवळ्या सामाजिक संस्था काम करीत वेगवेवळ्या सामाजिक संस्था काम करीत आहेत. त्यांपैकी देशात नावाजलेल्या असर व प्रथम या संस्थेनच्याअहवालानुसार देशात महाराष्ट्र शिक्षणात पुढे असल्याचे सूतोवाच बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले . पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने तालुक्यातील ७३ शिक्षकांना शरद भूषण पुरस्कार खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी त्यांनी हे प्रतिपादन केले. या वेळी पुरंदरचे आमदार संजय जगताप, मा . आमदार अशोक टेकवडे,मा. सनदी अधिकारी संभाजी झेंडे.डॉ. प्रा. दिगंबर दुर्गाडे जिल्हा परिषद सदस्य दत्ताशेठ झुरंगे,पुरंदर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष माणिकराव झेंडे,सदस्या सुनीताताई कोलते , मा. सभापती गौरीताई कुंजीर,पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा वंदनाताई जगताप,पं. स सदस्या सोनाली यादव,पुढे- सुप्रियाताई सुळे विद्यमान सभापती लोळताई , सासवडच्या नगराध्यक्ष मार्तंड भोंडे जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणाताई सोनवणे ,बहुजन हक्क परिषदेचे सुनील तात्याधीवार शिक्षक नेते संभाजी थोरात, बाळासो मारणेआदी उपस्तीत होते. सुप्रियाताई सुळे पुढे म्हणाल्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत पुरंदर नेहमी अग्रेसर राहिला आहे. शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्याचा मी नेहमी आग्रह धरला आहे. शालेय पोषणासाठी वेगळी यंत्रणा नेमण्याचा विचार सरकार करत आहे. जेणे करून शिक्षकांना अध्यापनाचे काम पूर्णवेळ करता येईल, २६ जानेवारीला समाजातील सर्व थरातील लोकांना संविधानाची ओळखजास्तीत जास्त करून देण्याचे नियोजन करा. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला घटनेने दिलेला अधिकार कळावा या साठी प्रयत्न करा. असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र जगताप यांनी केले सूत्रसंचालन विजय वाघमारे यांनी तर आभार दुर्गाडे यांनी मानले.